मेथीचे पोळे

  • तांदुळ २ वाट्या
  • अर्धी वाटी ताज्या नारळाची (कीसुन)
  • चीमुट भर मेथी दाणे
  • आवडी नुसार गुळ
  • मीठ
  • साजुक तुप
१५ मिनिटे
४ लोकांन साठी

सकाळी दोन वाट्या तांदुळ व चीमुट भर मेथी एकत्र  भीजत घालणे. ( इड्लीचे तांदुळ भीजत घालतो तसे)

रात्री वाट्ताना(इड्ली प्रमाणे) त्यात अर्धा वाटी कीसलेला नारळ घालुन  (डोसाप्रमाणे) बारीक वाटावे. पाणि जास्त घालु नये.

हे वाट्ण तसेच रात्र भर फ़्रीज मधे ठेवले तरी चालते. सकाळी त्यात आपल्या आवडी नुसार गुळ व मीठ घालुन चांगले फ़ेटावे.

गोव्यात जाड बिडाचा तवा म्हणुन मीळतो त्या वर हे पोळे काढतात.( हा तवा लोखंडाचा आसतो) पण आपण नॉन स्टीकच्या तव्यावर काढ्ला तरी चालतील.

पॅन तापला की त्यावर  साजुक तुप एक चमचा घालावे व पॅन वर पसरुन घ्यावे. मग पोळ्याच्या पीठाचे दोन मोठे चमचे ह्या पॅन वर घालुन जरा पोळा जाड्च काढावा. ह्या पोळ्याला जाळी पडु लागेल वरतुन परत एक चमचा तुप सोडावे व लगेच झाकण ठेवावे.  (मंद आचेवर  हे पोळे काढ णे) काही वेळने झाकण काढावे . पोळ बाजुने तपकीरी रंगाचा व स्पंजा सारखा झालेला दीसेल तसा तो परतवावा.

बस २ ते ३ सेकंदतच तो ताट्लीत काढावा. साजुक तुप व मेथीचा वास  छान वास येतो.

हवे असल्यास लोणच्या बरोबर खावा किंवा तसा सुध्दा चालेल.

नाहीत.