तवसाळं

  • १/४ किलो जाड रवा
  • एका नारळाच्या वाटीतले खोबरे, १/४ किलो गूळ
  • १ वाटी भाजलेल्या दाण्यांचे तुकडे, १/२ वाटी काजू, बदाम तुकडे
  • १ मोठी काकडी
  • वेलदोडा पूड
  • १/४ चमचा सोडा किवा १/२ चमचा बेकिंग पावडर, १ चिमूट मीठ
४५ मिनिटे
४, ५ जणांना

रवा कोरडा भाजून घेणे.काकडी किसून पाणी बाजूला काढणे. किसामध्ये रवा,गूळ,खोबरे, दाणे, काजू, बदाम, वेलची पूड आणि सोडा  घालणे. चिमूटभर मीठ घालणे. थलथलीत भिजवणे. मिश्रण घट्ट वाटल्यास बाजूला काढलेले काकडीचे पाणी जरुर तेवढे घालणे.

अवन मध्ये १८० अंश से. वर २० ते २५ मिनिटे किवा गॅसवर केकपात्रात २० ते २५ मिनिटे बेक करणे.

तवस= काकडी. खिरे नव्हेत. मोठी जाड सालीची गडद हिरव्या रंगाची काकडी घेणे.

मी आमच्या त्सेंटा आजीला गुर्कन कुकन अर्थात काकडीचा केक ह्या नावाने  तवसाळं खिलवले आहे.

रेगेमावशी