ओल्या नारळाची चटणी

  • अडीच वाट्या ओल्या नारळाचा खव,
  • चिरलेली कोथिंबीर २-३ चमचे,
  • हिरव्यागार मिरच्या २-३
  • अर्ध्या लिंबाचा रस
  • मीठ, साखर अर्धा चमचा
१५ मिनिटे
२ जण

 वरील सर्व मिश्रण मिक्सर/ग्राइंडर मधून बारीक करा. थोडे पाणी घाला म्हणजे मिळून येईल. ही चटणी इडली, बटाटेवडा, मेदुवडा, साबुदाणा वडा यासोबत छान लागते. शिवाय उपवासाला पण चालते आणि सणवारात नैवेद्याच्या ताटात डावीकडे शोभून दिसते. अर्ध्या लिंबाचा रस असे दिले आहे तरी चटणी करताना त्यातला अर्धा रस घालावा मग चव पाहावी व नंतर परत लागल्यास घालावा. कारण काही लिंबे रसदार असतात तर काहींना कमी रस असतो. ही चटणी दह्यामध्ये मिसळून त्यावर तूप/तेल-जिरे- हिंग याची फोडणी दिल्यास अधिक चवदार होते शिवाय पुरवठ्यालाही येते.

नाहीत

स्वानुभव