ऑगस्ट ३० २००८

कोहं

कोहं कोहं
अंतराळी हुंकार
परावर्तित ध्वनी
रुकार ना नकार

प्रश्नांचे भोवरे
भोवऱ्यांचे प्रश्न
अणुच्या कणात
अस्तित्व चिन्ह

रहाट गाडगे
जीवाचे नियोजन
चक चक्रव्युहात
अज्ञात प्रयोजन

असे आसाभवती
तसे ध्यासाभवती
गती अगतिक
परिघाची भीती

शुक्ल ते कृष्ण
परिमाण हाती
कोहंच्या शोधी
अहं गच्छंती

Post to Feed

असे आसाभवती....

Typing help hide