चटपटीत सुके बोंबील

  • ८ बारीक पण मोठे सुके बोंबील
  • २ मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेले
  • २ मध्यम आकाराचे टॉमेटो बारीक चिरलेले
  • कडीपत्त्याची ४ पानं
  • थोडी कोथींबीर बारीक चिरलेली
  • घरगुती लाल मसाला १ चमचा
  • हळद चिमुटभर
  • दोन मोठे चमचे तेल
  • ४ कोकम
  • मीठ चवीपुरते
५ मिनिटे
चार जणांसाठी

प्रथम बोंबीलाचे तोंड व शेपटी कापून टाकून त्याचे थोडे मोठे तुकडे करून ते कोमट पाण्यात २ मिनिटे भिजत ठेवावे. गॅसवर लोखंडाचा कींवा भिडयाचा तवा ठेवावा, त्यात तेल टाकून ते चांगले तापू द्यावे. मंद आचेवर  तापलेल्या तेलात प्रथम कांदा टाकून तो चांगला लाल होईपर्यंत परतावा मग त्यात कडीपत्ता घालून परतावे. त्यात पाण्यात भिजत  ठेवलेले बोंबील काढून घालून परतावे त्यावर टॉमेटो, लाल मसाला, हळद, मीठ व कोकम घालून  पाण्याचा हबका मारून झाकण ठेवून मंद आचेवर २ मिनिटे शिजू द्यावे.  झाकण काढून पुन्हा पाण्याचा हबका मारून परतावे. वरून कोथींबीर टाकावी.

गरम गरम तांदुळाच्या भाकरीबरोबर खाण्यास द्यावे.  हा पदार्थ लोखंडाच्या कींवा भिडयाच्या तव्यावरच करावा छान होतो.

स्वअनुभव