सागरगड

आम्ही एकदा  अलिबाग जवळच्या सागरगड नावाच्या किल्ल्यावर गेलो होतो. हा किल्ला पेठ, पेब सारखा चढावयास सोपा आणि फारसा प्रसिद्ध नसल्यामुळे अजून स्वच्छ सुद्धा आहे.

किल्ल्यावर अजून सुद्धा बालेकिल्ला, तटबंदी शाबूत असून पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था १२ ही महिने असते. तिथेच वांदरटोक हा कडा असून तेथून रायगड जिल्ह्याचे अत्यंत विलोभनीय दर्शन घडते.

मुख्य म्हणजे तेथील सिद्धेश्वर नावाच्या शिवमंदीरात  दर शनिवार, रविवार भाविकांसाठी जेवणाची नि:शुल्क व्यवस्था असते ज्याचा गिर्यारोहक लाभ घेऊ शकतात.   तसेच तिथे दर शिवरात्रीला मोठा उत्सव होतो.

असा हा सागरगड, प्रत्येकाने जावे असा आणि त्याचे पावित्र्य राखावे असा.

काही  प्रकाशचित्र  आंतरजालाच्या  सौजन्याने  -

 मोठे चित्र येथे पाहा

 मोठे चित्र येथे पाहा

मोठे चित्र येथे पाहा

मोठे चित्र येथे पाहा

म. टा.   वर  सागरगड  -  दुवा क्र. १

विकीमापिया  वर  सागरगड  -  दुवा क्र. २

सकाळ वृत्तसेवा - दुवा क्र. ३