वाईन क्रीम

  • ५०० मिली व्हाइट वाइन
  • १०० ग्राम ( साधारण १ वाटी भरुन) साखर
  • एका लिंबाचा रस
  • १ चिमूट मीठ
  • २ अंडी
  • २ चमचे मोंडामीन किवा आरारुट किवा स्टार्च
४५ मिनिटे
४ जणांना

 लिंबाचा रस काढणे. मोंडामीन थोड्या पाण्यात विरघळवून घेणे. गुठळ्या झाल्या तर त्या मोडणे. त्यात चिमूटभर मीठ घालणे. एका जाड बुडाच्या पातेल्यात वाइन+साखर घेणे व मंद आचेवर गरम करत ठेवणे. त्यात लिंबाचा रस घालणे, ढवळणे. अंडी फोडून त्यातील पिवळा बलक घालणे व ढवळणे. अंड्यातील पांढरे भरपूर फेटून त्याचा आयश्ने तयार करणे. म्हणजेच अंड्यातील पांढरे इतके फेटणे की त्याचा पांढरा फोम तयार होतो; त्याला 'आयश्ने' म्हणतात.
मोंडामीन घालून सतत ढवळत राहणे. आच मंदच ठेवणे. शिजले की त्यात आयश्ने घालून ढवळणे. थोडे थंड झाले की सेट करण्यासाठी सेटिंगबाउल मध्ये ओतणे. पूर्ण थंड झाल्यावर फ्रिजमध्ये ८ ते १० तास ठेवणे.
थंड सर्व्ह करणे.

आमच्या त्सेंटाआजीच्या आजीची ही पाकृ आहे.

आच कायम मंद ठेवणे आणि सतत ढवळणे महत्त्वाचे आहे अन्यथा खाली पटकन लागायची शक्यता असते.

त्सेंटा आजी