जिन्नस
- कोबी १/२ किलो
- लाल मिरच्या ४-५
- १ लहान चमचा खाद्यतेल
- फोडणीसाठी मोहरी
- हिंग
- १ लिंबू
- मीठ चवीप्रमाणे
मार्गदर्शन
कोबी नेहमीप्रमाणे चिरून घ्यावा.
हिंग मोहरी आणि लाल मिरच्यांची फोडणी करावी. (फोडणीला हळद घालू नये.)
कोबी फोडणीस टाकून परतून घ्यावा पण मऊ शिजवू नये.
लिंबू पिळावे.
गरम गरम खावे.
टीपा
गरम पोळी असेल सोबत तर उत्तम!
माहितीचा स्रोत
आजेसासूबाई
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.