नोव्हेंबर
१४
२००८
तुझे माझे नाते कसे
प्रेमाने चिंब भिजलेले
फुलांसारखे फुललेले
मातीच्या सुगंधासारखे कधीही
हवेहवेसे वाटणारे
मनातल्या भावना जाणणारे
सुखा-दुःखात हसणारे
एकमेकात हरवणारे
प्रणयात धुंद होणारे
आयुष्याच्या खडतर वाटेवर कायम साथ देणारे.........
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
कविता छान आहे पण.....
प्रे. ऋचा मुळे (शुक्र., १४/११/२००८ - १६:१४).