नोव्हेंबर
१७
२००८
..................................
मंत्रभारल्यासमान...!
..................................
आज दर्वळे उगाच भोवतालची हवा!
मंत्रभारल्यासमान मंद मंद गारवा!आज एवढे मनास का प्रसन्न वाटते ?
सांगता न यें असे उरात काय दाटते ?
देहही जणू नवीन, प्राणही जणू नवा !तेवले कसे कुठून आज अंतरी दिवे?
स्पर्शल्याशिवायही मनास कोण हे शिवे ?
तृप्ततेतही अशी कळे न काय वानवा...!सांज आजची खरेच वेगळीच भासते...
पोर सावळी हळूच लाजते नि हासते...!
पेटतो जसा विझून एक एक काजवा !दुःख काळजामधील सारणार दूर मी...
पाहिजे तसाच आज लावणार सूर मी...
गाइलास तू मना, जरी चुकून मारवा!- प्रदीप कुलकर्णी
.....................................
रचनाकाल ः १५ नोव्हेंबर २००८
.....................................
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
तेवले कसे कुठून..
प्रे. सतिश वाघमारे (सोम., १७/११/२००८ - १८:२३).
वाचताक्षणीच वाटले अहा नि वाहवा!
प्रे. अलका विद्वांस (सोम., १७/११/२००८ - १८:२४).
...विशेष धन्यवाद! :)
प्रे. प्रदीप कुलकर्णी (बुध., १९/११/२००८ - १६:१५).
मस्त
प्रे. सुवर्णमयी (सोम., १७/११/२००८ - १८:३६).
सहमत आहे.
प्रे. आजानुकर्ण (सोम., १७/११/२००८ - १९:३३).
मंत्रभारल्यासमान...!
प्रे. मनीषा२४ (मंगळ., १८/११/२००८ - ०१:५८).
श्याम के बाद...
प्रे. मानस६ (मंगळ., १८/११/२००८ - ०३:१०).
अगदी
प्रे. श्रावण मोडक (बुध., १९/११/२००८ - ०९:१८).
सगळ्यांचे मनापासून आभार...
प्रे. प्रदीप कुलकर्णी (बुध., १९/११/२००८ - १६:२८).
वा प्रदीपराव, वा अलकाताई
प्रे. प्रणव सदाशिव काळे (रवि., २३/११/२००८ - १०:२०).
तरही दाद ?
प्रे. अलका विद्वांस (रवि., २३/११/२००८ - १४:४०).
त्याच वृत्तात त्याच तऱ्हेने दिलेली दाद
प्रे. प्रणव सदाशिव काळे (गुरु., २७/११/२००८ - १२:३१).
मारवा
प्रे. ऋचा मुळे (सोम., २४/११/२००८ - ०८:०८).
ऋचा मुळे यांना...
प्रे. प्रदीप कुलकर्णी (बुध., २६/११/२००८ - २०:२४).