नोव्हेंबर
१८
२००८
शब्द
पेलणारे भाव माझे शब्द नव्हते
बोलणारे सर्व माझे शब्द नव्हते
नेहमीचे साथ देणारे,मुक्याने
झेलणारे शब्द माझे शब्द नव्हते
सूर
सांगणारे भाव माझे सूर नव्हते
त्यागणारे सर्व माझे सूर नव्हते
आज नकळे नेमकेसे,त्या श्रुतीला
लागणारे सूर माझे सूर नव्हते
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
चांगला प्रयत्न
प्रे. जयन्ता५२ (रवि., २३/११/२००८ - ०५:२३).
धन्यवाद
प्रे. योगेश वैद्य (सोम., २४/११/२००८ - ०३:२१).