नोव्हेंबर
२१
२००८
मन बरसताना माझे तू हवा होतास.
ओल्या ओठांवरल्या दवाला तू हवा होतास.
ढगांचा गडगडाट, मनाचा हिंदोळा,
अंगावरचा शहारा, तुझ्यासाठी थांबला होता.
उबदार कवेत घ्यायला तू हवा होतास.
पावसाळ्यातला एकटेपणा, निसरडी माती,
उडणारा पदर, तुझ्यासाठी थांबला होता.
वाहणारे ओहोळ सावरायला तू हवा होतास.
हिरवाई सगळीकडे, झाडं वाढलेली चिकार,
काट्यात झुलणारा गुलाब, तुझ्यासाठी थांबला होता.
त्याच्या सुवासाला तू हवा होतास.
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
ओल्या ओठांवरल्या दवाला...
प्रे. सतिश वाघमारे (शुक्र., २१/११/२००८ - १७:१२).
स्वागत!
प्रे. जयन्ता५२ (शुक्र., २१/११/२००८ - १९:२९).
धन्यवाद
प्रे. ग्रामिण मुम्बईकर (रवि., २३/११/२००८ - १८:१९).