नोव्हेंबर
२१
२००८
डोरियन ग्रे
"बिग बॉस मधून एकाचे पलायन"
कॅमेराच्या झगझगाटात
प्रश्नांची सरबत्त्ती..
सेलेब्रिटी उभी आपल्याच धुंदीत
तिथेच आशाळभूतपणे उभी असणारी
पोट खपाटीला गेलेली, झिपऱ्या केसाची कोवळी मुले ..
कुणालाच दिसली नाहीत?
नेहमी सुंदर दिसण्याचा, असण्याचा
आणि बघण्याचा हट्ट
वाढतोच आहे...
एक कॅमेराचा झोत गेला की
मागे उरलेल्या अंधारात
अनेक जण सामावतात....
अगदी किमान एकास शंभरच्या प्रमाणात
निवडक काहींना कधी कळणार?
कधी कळणार आम्हालाही?
की वलयामागे
अंधारात
असंख्य 'डोरियन ग्रे' चाचपडत राहतात..
चालतेबोलते- हाडामासाचे .. प्रतिमेतले नाही!
कोणाच्यातरी पापाच परिमार्जन करत
जन्मभर ...
- सोनाली जोशी
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
वा...
प्रे. प्रदीप कुलकर्णी (शुक्र., २१/११/२००८ - ११:४९).
'डोरियन ग्रे' कोण?
प्रे. मोरूतात्या टोणपे (शुक्र., २१/११/२००८ - ११:५१).
मस्त
प्रे. श्रावण मोडक (शुक्र., २१/११/२००८ - १२:२९).
हा दुवा - माहिती
प्रे. सुवर्णमयी (शुक्र., २१/११/२००८ - १२:३७).
डोरिअन ग्रे - निवडक काहींना कळणार?
प्रे. हस्त लिखिते (शुक्र., २१/११/२००८ - १३:३८).
छान
प्रे. मिलिंद फणसे (शुक्र., २१/११/२००८ - १५:५५).
वा !
प्रे. सतिश वाघमारे (शुक्र., २१/११/२००८ - १७:२०).
डोरियन ग्रे
प्रे. अदिती (शनि., २२/११/२००८ - ०५:५२).
अदितीशी सहमत
प्रे. जयन्ता५२ (रवि., २३/११/२००८ - १६:३६).
आभार
प्रे. सुवर्णमयी (शनि., २२/११/२००८ - २०:५४).
ह्याल कविता का म्हणायच
प्रे. हस्त लिखिते (शनि., २२/११/२००८ - २१:२०).