एकटा मी ...

एकटा मी.....

आयुष्य भासे वाळवंट , एकटा पडलो मी 

निराशा मग व्यापून राहते ,एकटा पडलो मी

हिरवळ मजला  म्रुगजळ भासे एकटा पडलो मी

अपुऱ्या स्वापनांच्या आठवणींत एकटा पडलो मी

जीवन माझे रात्रीचा समुद्र ,

लाटांचा भीषण गॉगाट अन वाऱ्यांचे रौद्र

दिशाहीन प्रलयात सापडले मनाचे शीड

राहिले दूर किनारे, एकटा पडलो मी

........आयुष्य भासे वाळवंट, एकटा पडलो मी 

माणसांच्या जत्रा , नुसता रंगबिरंगी पसारा

अथांग विश्व भोवती ,पण सापडेना सहारा

निशा-प्रकाशाचा नुसताच खेळ दीपस्तंभ मिळेना

विश्व झाले एक कोडे उलगडता उलगडेना

स्वता: तच मी अडकत गेलो  एकटा पडलो मी

........ आयुष्य भासे वाळवंट, एकटा पडालो मी 

अनंत या पसाऱ्यात , आता माझा मीच दीपस्तंभ

श्वासाचा जडला छंद अन जाग्रुतीत धुंद

वाहते मन झाले , वाहते हे जग सारे

मीच साऱ्यांत सारे माझ्यात , एकटा नव्हतो मी

कोडे कुठेतरी उलगडते आत , एकटा नव्हतो मी....

                               एकटा नव्हतो मी....