स्वीकार तिला..!

आधी अग्नीसमोर तू, स्वीकार तिला
त्यानंतर, वाट्टेल तसे तू मार तिला.

तुमची कन्या- जणू उर्वशी! किती सदगुणी!
कशास मग... हे सोने भारंभार तिला?

दिलेत का हो प्रीतीचे क्षण?...जरा आठवा;
दिलात केवळ... ’वस्तूंचा’ संसार तिला

आतुर झाले नयनांचे खग; उडू लागले;
दूरून  जेंव्हा दिसले घोडेस्वार तिला!

 एकावरली शून्ये नेहमी वाढत होती;
कधीच नव्हता पण कर्जाचा भार तिला!

करु किती सत्कार, तरिही अपुरा पडतो;
घालुनी झाले, सर्व फुलांचे हार तिला!

                    -मानस६