पिठल्याच्या वड्या

  • डाळीचे पीठ १ वाटी
  • आले, लसूण पेस्ट १ चमचा
  • मीठ चवीप्रमाणे
  • फोडणीचे साहित्य
  • तेल
  • खिसलेले खोबरे
  • दाण्याचा कूट
  • मसाला
  • तिखट
१० मिनिटे

खिसलेले खोबरे, दाण्याचे कूट, तिखट, मसाला, मीठ एकत्र करून घ्यावे. हे झाले सारण तयार.  

एका पातेल्यात थोडे तेल घालून फोडणी करून घ्यावी. त्यात एक चमचा हळद घालावी.   नंतर पाऊण वाटी पाणी घालावे. चवीप्रमाणे मीठ घालावे. पाण्याला उकळी आल्यावर त्यात थोडे थोडे डाळीचे पीठ टाकावे, सोबत ढवळत राहावे. जर गुठळ्या होत असतील तर लाटण्याने हलवावे, म्हणजे त्या होणार नाहीत. आता दोन मि. झाकण ठेवावे. एकीकडे एका पोळपाटा ला तेलाचा हात लावून घ्यावा. आता हे तयार पिठले पोळपाटा वर टाकून पाण्याचा हात घेउन नीट पसरावे.

आता तयार सारण यावर पसरावे. हलक्या हाताने दाब द्यावा. आता या पिठल्याचा हलक्या हाताने रोल करून घ्यावा. थंड झाल्यावर वड्या कापाव्यात.

आमटी बरोबर किवा नुसत्या पण चांगल्या लगतात.

नाहीत

पारंपारिक