कोलंबीचे हुमण

  • सोललेली कोलंबी : १ वाटी
  • खवलेला नारळ : १ वाटी
  • काश्मीरी मिरच्या : १०-१२ नग
  • हळद : १/२ चमचा
  • चिंच : लिंबा एवढी
  • तिरफळं : १० - १२
  • मीठ : चवीनुसार
  • खोबरेल तेल : ३ टेबलस्पून
४५ मिनिटे
३ जणांसाठी


कृती:

कोलंबीला हळद आणि मीठ लावून ठेवावे.
काश्मीरी मिरच्या मिक्सर मधून फिरवून एकदम वस्त्रगाळ करून घ्याव्यात.
खवलेला नारळ, काश्मीरी तिखट, आणि चिंच गंधासारखे मुलायम वाटून घ्यावे. शेवटी तिरफळे घालून मिक्सर १-२ वेळा फिरवावा.
पातेल्यात नारळ, तिखट आणि चिंचेचे वाटण घालून गरजेनुसार पाणी घालावे. त्यातच कोलंबी घालून पातेले गॅसवर ठेवावे आणि उकळी आणावी. कोलंबी शिजली की वरून ३ टेबलस्पून खोबरेल तेल घालावे. पुन्हा एक दणदणीत उकळी काढून गॅस बंद करावा.
किंचित मुरल्यावर भातावर वाढावे.

कोलबी प्रमाणेच सुरमई, बांगडे, तारली ह्याचे 'हुमण'ही असेच करतात.

कृतीः

शुभेच्छा..!

टीपः कोलंबी लवकर शिजतात. जास्त शिजल्यास रबरासारख्या होतात. कमी शिजल्यास पचत नाहीत. त्यामुळे फक्त व्यवस्थित शिजवाव्यात.

थोडा वेगळेपणा आणण्यासाठी, (वरील प्रमाणास), २ टेबलस्पून खोबरेल तेलावर ८-१० काळे मिरे परतावेत. त्यावर २ बारीक चिरलेले कांदे लालसर रंगावर परतून घ्यावेत. कांदे परतले की ओला नारळ लालसर परतून घ्यावा. ह्याचे वाटण बनवावे बाकी कृती वरील प्रमाणेच करावी. अशा पद्धतीनेही 'हुमण' बनवितात.

पुस्तकी ज्ञान (अनुभवावर ताऊन सुलाखून घेतलेले)