मार्च २००९

कुकी कुठे जातात?

आय ई किंवा फायरफॉक्स सारख्या ब्राउझर्समध्ये , जेंव्हा एमडीआय इंटरफेस असते तेंव्हा , म्हणजे इंटरनेट एक्सप्लोअरर ७.० आणि त्यावरील व्हर्जन्समध्ये जिथे एकाच मुख्य खिडकीत अनेक पाने ब्राउझ करता येतात, तिथे मनोगतावर वावरताना मला एक विवक्षित अडचण जाणवते आहे.
एखाद्या दुव्यावर टिचकी मारून त्या पानावर गेले. की येण्याची नोंद गायब झालेली असते. तिथे पुन्हा नव्याने नाव नोंदवावे लागते. आधीच्या पानावर माझ्या नावनोंदणीची कुकी असताना , पुढच्या पानावर मी आल्याची नोंद नाही असे पाहून दुसऱ्या एखाद्या माणसाने त्याची येण्याची नोंद करण्याचा प्रयत्न केल्यास मात्र तिथे माझेच नाव दिसते.
अजून एक म्हणजे, मुख्य पानावर आल्याची नोंद करून दैनंदिन लेखांच्या पानावर आले की कुकी तर गायब असतेच पण दैनंदिन लेखनाच्या नोंदीही बऱ्याच जुन्या म्हणजे ३-४ दिवसांपूर्वीच्या असतात. संचित कुकी / कॅश सुद्धा मोकळी करून पाहिली पण हे जुन्या नोंदी दिसण्यामागचे कारण काय असावे हे कळू शकले नाही.
या कुकी कुठे जात असाव्यात? असा प्रकार आय ई ६.० पर्यंत होत नसे. आय ई ७.० आणि पुढच्या व्हर्जनांमधे काही तांत्रिक त्रुटी असल्यामुळे असे होते काय?
यावर काही उपाय आहे का?
आपल्यापैकी कोणाला असा अनुभव कधी आला आहे काय?
मोझिलामध्येही हाच अनुभव आल्यामुळे आता ब्राउझर तरी कोणता वापरावा? (क्रोम नुकताच उतरवून घेतला आहे पण त्याच्या यूझर इंटरफेसची सवय अजून झालेली नसल्यामुळे एवढा अनुभव येण्याइतका तो वापरता आलेला नाही. )
अशी अडचण मनोगतालाच का येते, ब्लॉग / ओरकुट / ईपत्रपेट्या / इतर मराठी संकेतस्थळे यांच्याबाबत असा अनुभव का येत नाही?
धन्यवाद
--अदिती

Post to Feed

हीच समस्या/एक उत्तर
हीच अडचण येते
प्रश्नाची तीव्रता कमी करण्याचा खात्रीशीर उपाय.
मलाही
आणि
हाहाहा
आता कविता विभागात काय दिसते?
माझ्या अडचणी
देवनागरी - रोमन लिपी
१ व ३
१. ला उपाय
क्रोम
क्रोम +
नवे न्याहाळक
काहीही फरक नाही.
कविता विभागाच्या यादीची माहिती द्यावी.
फाफॉमध्येही
गाणं ओळखा पाहू.... पासून दिसतंय
इतके जुने पान
एफ-५
एफ- ५
लेख लिहताना येणाऱ्या अडचणी....
पायमोडका न

Typing help hide