काही प्रश्न

काही प्रश्न पडले आहेत.

१. मनोगतावर कविता देताना दोन कडव्यांच्या मध्ये जर एक ओळ मोकळी हवी असेल तर ती कशी ठेवतात?

२. गद्य आणि पद्य विभागांत कोडी/कूटप्रश्न असा नवा प्रकार सुरू होऊ शकेल काय?

३. शब्दकोडे, उखाणे हे गद्य मानावे का पद्य? तसे निश्चित सांगता येत नसल्यास कोडी/ कूटप्रश्न असा नवा लेखनविभाग करता येईल का?

४. एखादी जुनी चर्चा पुन्हा सुरू करायची असेल तर केवळ त्यावर प्रतिसाद देऊन भागते का? का प्रशासकांची अनुमती लागते? असल्यास ही अनुमती कशी मिळवावी?