मी लिहिलेले उखाणे

१९७५ च्या आसपासचा काळ. पूर्वीच्या आठवणींना उजाळा देता देता आमच्या काळचे उखाणे ही आठवतात.

मी काही उखाणे लिहिलेत, ते मी क्रमशः देते आहे. कसे वाटले ते कळवा.

(१) सुदाम्याचे पोहे केले कृष्णाने भक्षण...

    --- राव म्हणतात, संकटकाळी मी करीन देशाचे रक्षण.

 (२) रामनामाने समुद्रावर दगड तरंगले...

  --- रावांच्या चरणी मी जीवन पुष्प वाहिले.

 (३) प्रभू रामचंद्राला बोरे अर्पून, शबरीने जीवन केले कृतार्थ...

  --- राव म्हणतात, "श्रद्धेविना जीवनाला नाही उरत अर्थ"

 (४) संस्कृत मध्ये पाण्याला म्हणतात उदक...

  --- रावांना आवडतात खुप मोदक