माझ्या मनाच्या गाभारी.....

माझ्या मनाच्या गाभारी / थोरा मोठ्यांची वसती /

इथे पैसा आहे फोल / मित्रता मात्र अनमोल /

माझ्या मनाच्या गाभारी / चित्तवृत्ती बहरल्या /

कधी रुसती फुगती / सदा हासती खेळती /

माझ्या मनाच्या गाभारी / विचारांची अती दाटी /

काही अर्धे आणि कच्चे  / काही पक्के मुरलेले /

माझ्या मनाच्या गाभारी /सारी करुणा दाटली /

दयेमध्ये चिंब होई / स्नेहभावे विरघळे /

माझ्या मनाच्या गाभारी / प्रत्यक्ष निर्धार  कोंडला /

जेव्हा कोणी भीती दावी / उफाळानी वर येई /

माझ्या मनाच्या गाभारी / कल झुके श्रमाकडे /

निद्रा, आळस, आराम / यांना आता जागा कोठे /

माझ्या मनाच्या गाभारी / कवितेचा मोठा तोरा /

निराशेच्या वातावरणा / तुला  मुळी नाही थारा /