हे खरे आहे का?? कृपया माहिती द्या.

http://bhagavata.org

येथून मी भागवत पुराण(थोडेसे) वाचले. त्यात १२.१.११ मध्ये भगवान चाणाक्य आणि चंद्रगुप्त मौर्य यांचा उल्लेख आहे.
माझ्या माहितीप्रमाणे भागवत पुराण भगवान चाणाक्याच्या किमान हजार वर्षे पुर्वी तरी लिहिले गेले आहे.
तर हा उल्लेख मुळ भागवतातलाच आहे की नतंरच्या काळात यामध्ये जबरदस्तीने लिहिल्या गेला आहे?? क्रुपया या बाबतीत माहिती द्या.
शक्य असल्यास संदर्भदेखिल द्या.

त्याचप्रमाणे मी असे ऐकले की ब्रिटीशांचे आक्रमण भविष्यपुराणात आधिच उल्लेखिलेले आहे. हे खरे आहे काय???

भ्रुगू संहितेतले भविष्य खरे होते असे म्हणतात(मला याउलट अनुभव आलेला आहे. माझ्याविषयी एकही भविष्य आजपर्यंत खरे ठरले नाही)
याबाबत आपले काय मत आहे?