टर्बो सी ते लायनक्स

मी जुन्या 'टर्बो सी' एडिटर / पॅकेज / कंपायलिंग एन्व्हिरॉन्मेंटमध्ये सी भाषेचे प्राथमिक धडे गिरवले होते. 'टर्बो सी' वर 'सी' किंवा 'सी प्लस प्लस' मधला कोड कंपाइल करताना सगळ्या हेडर फाईल्स सतत हाताशी असल्याने कोड लगेच कंपाइल होत असे.
'सी / सी++' आणि 'युनिक्स' हे नातं फारच जवळचं असल्यामुळे युनिक्सवर सी कोड लिहून तो कंपाइल करून पाहण्याची इच्छा होती. युनिक्समध्ये ( किंवा हल्ली 'लायनक्स'मध्ये) सी/सी++ कोड कंपाइल करायची सवय असली तरी संपूर्णपणे स्वत:चा कोड कधी लिहून पाहिला नव्हता. असाच चाळा म्हणून एक अगदी जुना, प्राथमिक अवस्थेतला आज्ञावली संच लायनक्सवर कंपाइल करून पाहिला असता लायनक्सवर 'कोनिओ' नावाची हेडर फाईल अस्तित्त्वात नसल्याचं कळलं. (conio.h)
मला clrsrc() आणि त्याहून जास्त म्हणजे  gotoxy() ही फंक्शन्स वापरून पहायची आहेत. कोनिओ ही तशी सी परिवारातली पायाभूत हेडर फाईल असून ती सगळीकडे उपलब्ध असायला हवी असे मला वाटत होते.
आता माझ्या शंका अशा आहेत
१. कोनिओ पुरवत असलेली सी लायब्ररी फंक्शन्स लायनक्सवर कुठल्या हेडर फाईल(स)मध्ये उपलब्ध होतात?
२. टर्बो सी / मायक्रोसॉफ्ट प्लॅटफॉर्म( फलाट म्हणणे अगदी जिवावर आले ) वरच्या अशा इतर कुठल्या गोष्टी आहेत ज्या लायनक्सवर मिळू शकत नाहीत?
३. यामागची कारणे इ. कुठे वाचायला मिळू शकतील?

यासंबंधी 'गूगल' विद्यापिठात माझे संशोधन सुरू आहेच (! ) पण इतर कोणाला अधिक माहिती असेल तर मला मदत कराल का?

धन्यवाद.
--अदिती
ता. क.
वरील चर्चेशी संबंधित पण विषयांतर ठरू शकेल असा एक मुद्दा म्हणजे पोसिक्स ( posix )लायब्ररीबद्दल कोणी  अधिक माहिती देऊ शकेल का?
पुन्हा एकदा धन्यवाद.
--अदिती