स्त्री पुरुष आणि आशावादी दृष्टिकोण

स्त्री आणि पुरुष हे निसर्गानेच असमान बनवले आहे त्यामुळे त्यांत भेद असणे साहजिकच आहे. या चर्चेतून कोणा एकावर आरोप वा दुय्यमत्व लादायचे नसून असे घडते का आणि घडत असेल तर का हे मला जाणून घ्यायचे आहे.

माझ्या अनुभवातून (आणि काही पुस्तकांतुन) मला असे जाणवले की पुरुषांच्या मानाने स्त्रिया अधिक नकारात्मक विचार करतात. पुरुष कोणत्याही साध्या गोष्टीचा खुप खोलवर विचार करत नाही, तर स्त्रिया त्यावर बराचसा नकारात्म्क भावनिक विचार करतात. स्त्रियांच्या बोलण्यात "ती तशी खुप चांगली आहे पण.......... " किंवा "माझ्याच बाबतीत असं का होत" असं अगदी साध्या साध्या गोष्टीतही चालते.

स्त्रिया कोणत्याही गोष्टीची नकारात्मक बाजुच जास्त बघतात, तर पुरुष "इटस ओके" म्हणत सोडून देतो, असं मला वाटतं. स्त्रियांचे संबंध लवचिक असतात, म्हणजे एकाच व्यक्तीशी त्या रोज रोज भांडुनही तीच्यासोबत राहू शकतात (उदा. नोकरीतील बॉस) , तसं पुरुषांच नसतं. पुरुष म्हणजे एक घाव दोन तुकडे. नाही पटत तर बोलण सोड किंवा संबंध. कदाचित त्यामुळे स्त्रियांपेक्षा पुरुष लौकर नोकरी बदलत असावे. (अर्थात ज्यांना शक्य असते ते)

प्रत्येक गोष्ट विशिष्ट पद्धतीने झाली पाहिजे, असा स्त्रियांचा आग्रह असतो तर पुरुष "झाली" बघतात. थोडक्यात पुरुष "रिझल्ट ओरिएंटेड" असतो तर स्त्री "प्रोसिजर ओरिएंटेड". त्यामुळे कदाचित लेडी बॉस च्या हाताखाली पुरुषाला काम करताना अधिक त्रास होत असावा. (मला याचा अनुभव नाही.)

प्रत्येक बाबतीत नकारात्मक भुमिका घेणारे पुरुषही मी बघितले पण क्वचित.

तुमचा काय अनुभव आहे ? खरच स्त्रिया नकारात्मक विचार करतात का ? का त्या बोलायच म्हणून बोलायचं म्हणून बोलतात पण समोरच्याला ते खटकतं ? का हा फक्त माझाच अनुभव आहे ?