तीर्थरूप

तिर्थ्ररुप ह्या जगाचे आंम्ही
चिरंजीव बनुनी जगतोय काय?
उपासक पिढीजात ज्ञानाचे आपण
भीक ज्ञानाची मागतोय काय?

आहेतच ते जिवाला चिरून उरणारे
पण आपण तर त्यांचे तिर्थ्ररुप आहोत
इतिहास ते आम्हा काय शिकवतील
आपण तर इतिहास रचेते आहोत

विश्वामित्राच्या प्रतिकृती आपण
प्रतिसृष्टीचे आम्हीच रचिते
वसिष्ठ आमच्यात नित्य वसे आणि
त्या सम आपण दृढही आहोत

नसा नसात राम हि येथे
घरा घरात तर सीता आहे
नित्य गाडतो रावण येथे
पवनपुत्र सम बाहुबली आहोत

पराजित कधी होतो आम्ही
अजेय आंम्ही अविचल आहोत
सळसळता जरी अग्नी शरीरातून
आजही आंम्ही आहोत हिमालय