सोयाबीन रस्सा

  • सोयाबीन वडी - २ वाट्या
  • किसलेले सुके खोबरे-१ वाटी
  • उभा चिरलेला कांदा-१ मोठा
  • लसूण पाकळ्या-१५/२०
  • मिरी दाणे-५/६
  • लवन्गा-५/६
  • आले- मध्यम तुकडा
  • कोथिंबीर-१/२ वाटी
  • लाल तिखट-चवीनुसार
  • मीठ-चवीनुसार
१५ मिनिटे
४/५ जणाना

सर्वप्रथम एका सोयाबीन वडीचे दोन तुकडे असे सर्व तुकडे करून घ्यावे. कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालून किसलेले खोबरे, आले ,लसूण, कांदा, लवंगा, मिरे भाजून घ्यावे. खोबर्याचा रंग बदलला की गस बंद करून सर्व जिन्नस वाटून घ्यावे.

कढईमध्ये तेल घालून त्यात थोडी साखर घालवी.साखर घातल्याने तेलाचा मस्त तवंग येतो. नंतर त्यात लाल तिखट आवडीनुसार घालावे.
 हा रस्सा जरा झणझणीतच चांगला लागतो. तेल तापल्यावर त्यात वाटलेली पेस्ट घालून खूप परतावे. खोबर्याला तेल सुटेपर्यंत परतावे. नंतर त्यात तुकडे केलेले सोयाबीन घालून थोडे परतावे. उकळलेले पाणी घालून सोयाबीन शिजू द्यावे. चवीनुसार मीठ घालावे.
शिजल्यावर वरून कोथिंबीर घालावी.
गरम गरम भाकरीबरोबर वाढावे. सोबत कांदा चिरून द्यावा.
नेहमीपेक्षा चार घास जास्त जातात.

नाही