अशी घडावी भेट एकदा

अशी घडावी भेट एकदा
ध्यानी मनी नसताना
असे काहीसे घडावे
नजदीक तुझ्या मी असताना

असा असावा प्रहर एकदा
दिवेलागणी होताना
ध्यास तुझा घरी परतायचा
पण श्वास इथेच गुन्तलेला

लाजेचे  तुझ्या नाजुक धागे
अलवार नाजुकपणॅ वीरावे
गूज माझ्या  मनीचे
अलगद तुझ्या अन्तरी उतरावे

बोलल्यावाचून  तुला उमगावे
भाव माझ्या ह्रुदयीचे
बेभानपणे तू उधळून द्यावे
सर्वस्व आजवर जपलेले

सुप्रिया