सप्टेंबर २४ २००४

मराठी शुद्धलेखन

या site वरील लेख, विचार वाचताना एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे काही ठिकाणचं अशुद्ध मराठी. (हे माझं लिखाणही त्याला बहुदा अपवाद नाही). शुद्धलेखनाचे नियम ज्यांना माहित आहेत त्यांनी ते येथे लिहावे अशी मी सर्वांना विनंती करत आहे...


मनोगत या साईट वर सभासद झाल्यापासून अनेक चर्चांमध्ये भाग घेतला. बर्‍याच जणांचे लेख, विचार वाचले. इतकं मराठी वाचून खूपच आनंद झाला. या साईटचं करावं तितकं कौतुक थोडं आहे. मुख्यत्वे ही site Unicode मधुन तयार करण्याचा निर्णय तर फारच चांगला आहे. किंबहुना याची मराठी भाषेला गरज होती असं माझं स्वत:चं मत आहे.

आज eSakal, Loksatta, Maharashtra Times अश्या अनेक मराठी sites आहेत. पण सर्वांचे आपापले fonts आहेत. या siteने मात्र Unicode वापरुन नवीन पायंडा पाडला. इथुन पुढे सर्व sitesनी Unicodeमधील मराठी वापरणे गरजेचे आहे.

परंतु या site वरील लेख, विचार वाचताना एक गोष्ट मात्र जाणवली, ती म्हणजे काही ठिकाणचं अशुद्ध मराठी. (हे माझं लिखाणही त्याला अपवाद आहे असं मी म्हणत नाही). पण केवळ र्‍हस्व दीर्घाबाबत मी बोलत नाहीये. तर टंकलेखनातील चुकांबद्दलही काही लेखांमध्ये थोडा निष्काळजीपणा दिसत आहे. उदा. n वापरुन 'न' हे अक्षर तयार होत आहे, पण 'ण' लिहीण्यासाठी मात्र N लिहीणे आवश्यक आहे. तेवढी ही काळजी काही लोक घेत नाहीयेत.

टंकलेखनाबाबतीत सहाय्यासाठी सर्वांनी याच site वर उपलब्ध असलेला 'देवनागरी टंकलेखन सहाय्यक' जरुर वापरावा अशी माझी सर्वांना विनंती आहे.

राहीला भाग शुद्धलेखनाचा. तर त्यासंबंधीचे नियम ज्यांना माहित आहेत त्यांनी ते जरुर येथे लिहावे अशी मी सर्वांना विनंती करत आहे.
या site चाच एक भाग म्हणुन प्रशासकांनीच जर ते नियम सर्वांना उपलब्ध करुन दिले तर सोन्याहुन पिवळे.

Post to Feed

तुमचे निरीक्षण
सामान्य चुका
तुम्ही हे लिहीत
दीर्घोपयांत ?
दीर्घोपान्त्य ?
आग्रही रहा पण...
धन्यवाद
काही माहिती.
दीर्घोपांत्य नव्हे..& भा
भाषा शुद्धी
अनुभव की मत?
(विचार) = (अनुभव+निरिक्षण+
औचित्यपूर्ण!
मु(मू?)लभु(भू?)त नियम
धक्कादायक
यांत काय धक्कादायक?
बारखडी

Typing help hide