तेथे पाहिजे जातीचे !

    वॉशिंग्टन डी.सी. मधील व्हाइट हाउसच्या कुंपणाच्या दुरुस्तीचे काम निघाले. त्यासाठी एक भारतीय एक बांगलादेशी आणि एक चिनी ठेकेदार यांनी काम करण्याची तयारी दाखवली व कामाची पहाणी करून खर्चाचा अंदाज हाउसच्या अधिकाऱ्याला देण्यासाठी आले.
       बांगलादेशीने टेप काढून कुंपणाचे माप घेतले  आणि काही आकडेमोड मनाशी करून तो म्हणाला
" माझ्या मते या कामाला $९०० एवढा खर्च येईल ($400 साहित्यासाठी,$ ४०० मजुरी आणि $१०० माझा फायदा).
  त्यानंतर चिनी  पुढे आला,त्यानेही मापे घेतली आणि त्याने खर्चाचा अंदाज दिला,
" मी हे काम $ ७०० मध्ये करीन. (साहित्याचे $३००,मजुरीचे $३०० आणि माझा फायदा $१००)
त्यानंतर भारतीय   पुढे आला आणि त्या अधिकाऱ्याच्या कानात कुजबुजला," $२७०० "
अधिकाऱ्याने आश्चर्याने विचारले,
"हे काय तू  मापे वगैरे काही न घेता एकदम आकडाच सांगितलास आणि तोसुद्धा इतका मोठा ?"
भारतीय ठेकेदार पुन्हा तशाच आवाजात उत्तरला,
" $१००० मला ,$१००० तुला आणि मी चिनी ठेकेदाराकडून भिंत बांधून घेतो."
" शाबास ! काम तुलाच " अधिकाऱ्याने त्याच्या हातावर टाळी देत म्हटले.