धर्म

चिंटू म्हणाला आईला
उत्तर दे माझ्या प्रश्नाला

वर्गात माझ्या खूप मुले
खेळती संगे मजेत झुले

रफिक, डॅनियल, कांबळे
अनंत, अनिकेत, सगळे

त्यांचे धर्म असती वेगळे
खेळती मात्र संगे सगळे

धर्म का असती निराळे
कोडे पडले मज आगळे

आई म्हणे चिंटू बाळा
उत्तर याचे सांगते तुला

देशात असती अनेक नद्या
मिळतात शेवटी सागराला

तसेच धर्माचे आहे पोरा
मार्ग भिन्न पण लक्ष इश्वरा

हिंदू मानतात मूर्तीपूजेला
ख्रिश्चन मानतात येशुला

मुसलमान मानती खुदाला
बौद्ध मानती बौद्धाला

प्रत्येकाचे पंथ असती वेगळे
प्रत्येकाचे मार्ग निराळे

शिकवण मात्र एकच असे
जिंकावे सर्वांना प्रेमाने कसे

खेळामध्ये नसे भेदभाव
खेळ देतो हर्ष अन प्रेमभाव

मनांत सारे निश्चय करा
ह्रदयी वाहे माणुसकीचा झरा

प्रेम व शांतीचे वाटप करा
मानवता हाच श्रेष्ठ धर्म खरा