ऑक्टोबर
५
२००९
जिन्नस
- कोबीची पाने १०-१५ (बाहेरची पाने सुद्धा चालतात), पालक २ पाने, गाजर व बीट छोटे तुकडे दोन्ही मिळून पाऊण वाटी,
- १ मध्यम बटाटा, १ छोट कांदा, २ टोमॅटो.
- धने-जिरे पूड १ चमचा प्रत्येकी, साखर, मीठ, मिरेपूड पाव चमचा, लाल तिखट ( चिमूटभर)
मार्गदर्शन
१) सर्व भाज्या जाडसर चिरून एकत्र वाफवून घ्याव्यात.
२) मग वाटणयंत्रातून (मिक्सर) वाटून घ्याव्यात.
३) मग मिश्रण सरसरीत होईल इतके पाणी घालून गॅसवर उकळायला ठेवावे.
४) धने-जिरे पूड , चवीपुरते साखर + मीठ, मिरेपूड , लाल तिखट घालावे.
५) गरम गरम प्यावे. प्यायला घेतांना त्यात थोडे लोणी घ्यावे.
टीपा
अजूनही कुठल्या भाज्या, कडधान्ये घालता येतील.
चविष्ट 'डाएट' सूप आहे. ( लोणी न घातल्यास ) :)
बटाटा असल्याने कॉर्नफ्लोअर ची गरज पडत नाही.
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
शंका...
प्रे. प्रदीप कुलकर्णी (सोम., ०५/१०/२००९ - १२:००).
चव..
प्रे. मृ (बुध., ०७/१०/२००९ - ०४:३६).
अच्छा...
प्रे. प्रदीप कुलकर्णी (बुध., ०७/१०/२००९ - १४:२१).
वादाचे मुद्दे..
प्रे. मृ (गुरु., ०८/१०/२००९ - ०६:०४).
काय बोलणार ?
प्रे. प्रदीप कुलकर्णी (शुक्र., ०९/१०/२००९ - ०७:२१).
वाद..
प्रे. मृ (शनि., १०/१०/२००९ - ०४:४०).
जाऊ द्या..:)
प्रे. प्रदीप कुलकर्णी (शनि., १०/१०/२००९ - १४:२३).
सूप, वाटण, लसूण
प्रे. मृदुला (शुक्र., ०९/१०/२००९ - १७:१७).
खरंच की..
प्रे. मृ (शनि., १०/१०/२००९ - ०४:४९).
डोकेबाज युक्तिवाद
प्रे. प्रदीप कुलकर्णी (शनि., १०/१०/२००९ - १४:४३).