कै. शं. रा. भागवत ... (काही पुरावे)

मागे मी कै. शंकर रामचंद्र भागवत यांच्याबद्दल थोडेसे लिहिले होते तेंव्हा दाखले, पुरावे मागितले गेले होते. ते रास्तही होते. कारण आत्ताच्या काळात त्यांचे नाव कोणाला माहित असण्याचे कारण नाही. आणखी थोड्याश्या माहितीसाठी खालील लिंक पहा....

दुवा क्र. १

भागवतांचा पुण्यातील डेक्कन जिमखान्यासाठीचा आराखडा उत्कृष्ठ नमुना मानला गेला......

पुण्याच्या नगरसंस्थेच्या शताब्दी अंकातही भागवतांचा उत्कृष्ठ आणि कडक शासक म्हणून उल्लेख अनेक ठिकाणी आहे.

सोनुताई काळे यांना आप्पासहेब म्हणजेच कै. शं. रा. भागवत यांच्याबद्दल आदर होता. मी भागवतांबद्दल पूर्वी जे लिहिले होते की ते एका खेडेगावात १६ वर्षे प्रयोग करीत होते, त्या गावात त्यांची साथ देण्यात सोनुताई काळे यांचा विशेष सहभाग होता. कै. सोनुताई काळे यांनी अमक्या गावातील १६ वर्षे असा लेख लिहिला आहे. तो माझ्याकडे उपलब्ध आहे.

त्या गावात त्यांना आलेल्या अडचणी, त्यांनी काही चुकीच्या परंपरांच्या विरुद्ध उभे राहणे, त्यांच्यावर पडलेला बहिष्कार, बहिष्कार असतानाही गावाच्या विकासासाठी अक्षरशः रात्री-अपरात्री त्यांनी केलेली धावपळ, जात-पात न पाहता संर्वांना सामावून घेण्याची त्यांची वृत्ती, या सर्व गोष्टी त्यात आहेत.

त्या गावातील एक व्यक्ती अजूनही आहे. त्याबद्दल मात्र मी नंतरच सांगेन.

वर दिलेल्या लिक्स मध्ये एस. आर. भागवतांचा उल्लेख येणे क्रमप्राप्तच आहे. हे कोणी, कसे लिहिले हे मात्र मलाही माहित नाही.

अस्तु.