ऑक्टोबर २३ २००९

मित्र-प्रेमाचे सुनीत

ह्यासोबत

     लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी सांगे मला बायको,
"पार्टीला तुमचेच मित्र सगळे आले. न माझे कुणी.
होते पुष्कळ वर्गमित्र मजला, (नाही जरी मैत्रिणी.)
     साऱ्यांची कशि शुद्ध मैत्रि अगदी -- शंका कुणाची नको! "

     "स्पर्धा, वादसभा, ट्रिपा नि शिबिरे वा स्नेहसंमेलनी,
काहीही स्थळ काळ वेळ असुदे, मी एकटी ना दिसे.
'होंडा, चेतक, राजदूत, यझदी' सोडावया येतसे!
     कोणीही परी आज ना फिरकले, - सर्वांस बोलावुनी! "

     "गप्पा मारत तासतासभर जे थांबून रस्त्यामधे,
ते आता मज पाहता झटदिशी रस्ताच ओलांडती!
पूर्वी राहत भोवती सतत - ते आताच का टाळती?
     सांगा ना मम चूक काय?" म्हणुनी ती स्फुंदता, मी वदे --

"मैत्रीची अग एक एक असते 'गोची', तुला ना कळे.
     माझी झालिस तू, नि मित्र बघ ना, माझे किती वाढले!! "

पुणे १९८४

Post to Feed

हेच
८४ साली होंडा?
झक्कास !
सुंदर
वा
वा

Typing help hide