ऑक्टोबर २३ २००९

त्रिकालाबाधित शब्द

एखादा माणूस स्वतःच्या गावाहून दुसऱ्या गावाला कामानिमित्त जातो. तिथे होणाऱ्या प्रश्नोत्तरात एक प्रश्न हमखास हा असतो:
तुम्ही प्रॉपर ------ चे का ?
गाळलेल्या जागेत त्या माणसाच्या मूळच्या गावाचे नाव.
उदा.
तुम्ही प्रॉपर नगरचे का ?
तुम्हा प्रॉपर बीडचे का ?

इत्यादी इत्यादी इत्यादी.

'प्रॉपर' हा शब्द या वाक्यात संपूर्ण महाराष्ट्रात वापरला जातोच जातो. खरे तर, हा प्रश्न विविध तऱ्हांनी विचारला जाऊ शकतो.
उदा.
तुम्ही मूळचे नगरचे का ?
तुम्ही बालपणापासून बीडला राहात आहात का?
तुम्ही अगदी पहिल्यापासून सांगलीचेच का ?

वर्षानुवर्षे हा प्रश्न याच शब्दासकट विचारला जात आहे.
(एरवी हा प्रश्न विचारणाऱ्यांना इंग्रजी बोलता येत नाही पण या वाक्यात न चुकता हा शब्द आणलाच जातो.)

'प्रॉपर' हा शब्द इतका कसा रुजला असावा?
 

मुख्य गावचे का हा प्रश्न
भ्रमंती, अगदी "नेमके" उत्तर दिलेले आहेत! "प्रॉपर" म्हणता येईल!!
अर्थ
सा?

Typing help hide