ऑक्टोबर
२४
२००९
जिन्नस
- बारीक रवा १ वाटी
- साय १/२ वाटी
- दुध १/२ वाटी
- ओल्या खोबरयाचा चव १ वाटी
- साखर २ वाट्या
- व्होनिला ईसेन्स १/२ चमचा
- रासबेरी रेड रंग चिमुटभर पावडर
- साजुक तुप २ मोठे चमचे
- काजू पोलपाटावर ओबडधोबड केलेले १/२ वाटी
मार्गदर्शन
वरील सर्वे साहीत्य हींडालीयम कढईत एकत्र करून गॅसवर ठेवणे. कढईला कडा पांढरया दिसेपर्यनत ढवळणे. त्यानंतर कढई खाली उतरवून गोळा होईपर्यनत ढवळणे. त्यानंतर पोलपाट व लाटणे याला तुप लावून लाटणे व लाटून झाल्यावर त्यावर शिल्लक राहीलेली काजू पावडर पसरवणे व परत लाटणे, फीरवणे. त्यानंतर वड्या पाडणे.
टीपा
नुसत्या खायच्या.
माहितीचा स्रोत
माझी आई
यंदाच्या मनोगत दिवाळी अंकासाठी आपले उत्तमोत्तम लेखन पाठवणार आहात ना?- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
