मुक्तिदाता

अ-भाव, किर्र, काळा,
शून्य, कभिन्न, अंधार!

मनांच्या कल्लोळात,
इंद्रियांच्या अविष्कारातही

उच्चाराच्या अपेक्षेत,
उद्गाराच्या प्रतीक्षेतही

पाणावलेल्या डोळ्यांत,
उकललेल्या पापण्यांतही

विरलेल्या विस्मृतीत,
दाटलेल्या आठवणींतही

सुन्न एकटेपणात,
समुहांच्या दाट गर्दीतही,

निःशब्द रात्री,
अबोल दिवसाही

भारलेल्या जन्मकैदेत,
आभास अन् अस्तित्त्वाचा
अनासक्त मुक्तिदाता
काळाकभिन्न अंधार!