ऑक्टोबर
३१
२००९
ते पाखरू दिवाणे दिनरात गीत गाते
नेतील पंख तेथे घेऊन सूर जाते
ते एकटेच फिरते, ते बांधते न घरटे
ते गुंतते न कोठे, ते जोडते न नाते
दिसला कधी न त्याच्या चोचीत एक दाणा
बळ आणते कुठोनी,पोटास काय खाते?
कंजूष मेघ सारे देती न थेंब कोणा
प्राशून आसवे ते मग आसवात न्हाते
हातावरी न रेषा,त्याचे ललाट कोरे
होणार काय ह्याचे, चिंतेत ते विधाते
----------------------------------------------------
जयन्ता५२
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
व्वा!
प्रे. बेफ़िकीर (शनि., ३१/१०/२००९ - १०:३५).
सुंदर..
प्रे. चैतन्य दीक्षित (सोम., ०२/११/२००९ - ०६:१४).
वा..
प्रे. चक्रधर१ (सोम., ०२/११/२००९ - १२:०५).
प्राशून आसवे ते...
प्रे. सतीश वाघमारे (सोम., ०२/११/२००९ - १७:५२).
छान
प्रे. जीवन जिज्ञासा (मंगळ., ०३/११/२००९ - ०१:४७).
छान!
प्रे. अजब (शनि., ०७/११/२००९ - ०५:३७).
सुंदर
प्रे. कुमार जावडेकर (शनि., ०७/११/२००९ - १०:४४).
नेतील पंख ........
प्रे. सुधीर कांदळकर (सोम., ०९/११/२००९ - १४:२५).
विधाते
प्रे. जयन्ता५२ (सोम., ०९/११/२००९ - १७:४०).