सगळं जगणं कसं निरभ्र

सगळं जगणंच कस निरभ्र असत;

लांबवरच्या क्षितिजाच मनही जवळच;

तुझं काय, माझं काय, सगळं असच की.

तू सगळ्या मर्यादा ओलांडून जातोस;

अगदी माझ्या डोळ्यांपलीकडे;

पण किनाऱ्यावर जीव झुरायचा तो झुरतोच.

डोळ्यातले भाव पापण्यांने लपवता येतात;

मला जमतं पण तुला ते कळतही जात;

अन् माझं जगणंच पुन्हा तेजाळून जात.

माझं पुन्हा पुन्हा झाकणं सुरूच;

अनंत अंधारात ऐक प्रकाशाची तिरीप;

माझं फसणं, तुझं फसवणं, पुन्हा सुरूच.

म्हणूनच तर माझं राहणं आता;

फटफटीत अन् अलिप्त;

समांतर आयुष्य जगणं माझं आपलं चालूच.