प्राँस् पालक (कोलंबी पालक )

  • १ जुडी पालक
  • १५ - २० मोठ्या कोलंब्या
  • १ कांदा बारीक चौकोनी चिरलेला
  • आख्खा गरम मसाला ( काळीमीरी ८-१० , लहान तमाल पत्र , थोडी दालचीनी)
  • मीठ चवी नुसार
  • ३ चमचे तेल
१५ मिनिटे
४ जणांसाठी

पालक नीट धुऊन घ्यावी.  एका भांड्यात पाणी घालून पालक शीजवून घ्या. शीजताना झाकून  शीजवू नये. पालकचा हिरवा रंग काळपट होतो.  पालक ७-८ मिनीटात शीजते. थोडया वेळाने गार झालेली  पालक मीक्सर मध्ये घालून पेस्ट करा.

दुसऱ्या भांड्यात तेल गरम करून त्यात आख्खा गरम मसाला घाला. नंतर बारीक चिरलेला कांदा घालून परतवावा. कांदा गुलाबी झाला की त्यात कोलंब्या टाकून २-३ मिनीट परतत रहावे.  मीठ चवी नुसार घालाव . ( मीठ  जरा बेताने घालाव कारण पालक मध्ये क्षारांच प्रमाण बरच असत. ) शेवटी पालकची पेस्ट  टाकावी. मंद आचेवर ८ - १० मिनीट शिजू द्या. शीजताना झाकण ठेउ नये.

 

हा पदार्थ मला इतका आवडला की मी आईच्या मागे लागून तीला हा पदार्थ काकींकडून शिकायला लावला. आणी मग मी आई कडूनं शिकलो.

 चपाती किंवा पराठ्या बरोबर मस्त लागते.  आईच्या हातच्या गरम गरम तांद्ळाच्या भाकऱ्या आणी  प्राँस् पालक.  बस और क्या चाहीये.

माझ्या लहानपणी (सांताक्रुझला) आमच्या शेजारी रहाणाऱ्या (टेकाडे ) काकींच्या हातचा हा पदार्थ खाल्ल