नोव्हेंबर
२७
२००९
सखे मी शोधितो तुझाच चंद्र कधीचा
पाणावले नयन दर्शना तरसले ...!
पाणावले नयन दर्शना तरसले ...!
का चांदणे सदा बरसले तुजवरी ?
बरसताना कसे मलाच विसरले...?
मोहरला देह ओलावली काया तुझी,
वाटेवरून माझ्या मेघही परतले...!
सावरले तुज पाहता मुग्ध दंवबिंदू..,
क्षितिजावरले माझ्या धृवही सरकले !
थांबली पुनव, सखे तुज स्वागता..,
स्वप्नातले बघ माझ्या चंद्रही फिकुटले!
विशाल
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
वाटेवरून माझ्या मेघही परतले...!
प्रे. जयन्ता५२ (सोम., ३०/११/२००९ - १७:२३).
धन्यवाद .
प्रे. विशाल कुलकर्णी (मंगळ., ०१/१२/२००९ - ०४:४७).