कधी नुसताच फिरलो दारो-दार
बेधुंद वारयावर होऊनी स्वार...
कधी नुसतीच ऐकली गाणी
अडवुनी डोळ्यात दाटले पाणी...
कधी बुडून आकंठ पाण्यात
मोजिले क्षण विनाकारण...
कधी ऊगीचच चिडून सखीशी
विनाकारण केले भांडण...
अशा कित्येक निरर्थक गोष्टीत
ऊगीच अर्थ शोधून पाहीला...
अशा कित्येक कुंचल्यानी
माझ्या एकांतात रंग भरला....
यंदाच्या मनोगत दिवाळी अंकासाठी आपले उत्तमोत्तम लेखन पाठवणार आहात ना?- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
अडवुनी डोळ्यात..
प्रे. सतीश वाघमारे (शनि., २८/११/२००९ - १९:००).
सुंदर..
प्रे. चैतन्य दीक्षित (सोम., ३०/११/२००९ - १२:३८).
