माझे असणेच इथे वावगे आहे

कळेना कुठे सर्व हरवून गेले;

वेचताना इथे सर्व ओघळून   गेले ;

कधी नाचणे माझे परिपक्वतेचे;

कधी घुंगरू  चाळ सोडून गेले.

खरे सांगणे माझे खोटेच ठरले;

दिलासे दिले तरी आभास उरले;

माझ्या मनाच्या या कल्पनेला;

वास्तवाचे चेहरे नशिबी न आले.

कधी कधी माझे स्वतःकडेच पाहणे;

आशा धरून नवी पुन्हा गोठून जाणे;

पाहताना थिजून माझ्या घराचे जळणे;

सावलीनेच माझ्या मला घायाळ केले.

बदलून गेले संदर्भ ते सारे;

झगमगाटात माझे हरवून जाणे;

सारे लोक माझेच भोवती तरीही;

असे एकटेपण कसे मी जगावे.

 नशिबाची रित  हि न्यारिच आहे;

निभावणे हे सारे अवघड आहे;

कुठे शोधायचे इथे माणुस माझे;

माझे असणेच तर  इथे वावगे आहे.