शब्दच नसते तर

शब्दच आधार
शब्दच निराधार
अगतिक पराधीन जगताचे ।

शब्दच गतिमान
शब्दच गतिहीन
न उमललेल्या भविष्याचे ।

शब्दच नसते तर
वाहिले नसते नयनातून अश्रू
शब्दच नसते तर
पडल्या नसत्या डोळ्यांतून ठिणग्या ।

आले नसते कोणी जवळ
गेले नसते दूर
शब्दच नसते तर ।

-- शशिकान्त द. टोपकर