गहिवर ओले..

गहिवर ओले..
===========
.
.
डोळ्यामध्ये
हास्य उमलले,
ओठांवरती
तरंग लहरले..!
.
ओंझळभरुनी
सुख ओसंडले,
भावफुलांनी
शब्द सांडले..!
.
गालावरती
उतरून आले,
कंठी दाटले
गहिवर ओले..!
.
आर्त कापरे
अंतर हलले,
ओठां वरले
कंपन विरले..!
.
पहाट मोती
कधीहे रुजले,
दुःख सुखावर
कुठूनी सजले..?
.
.
दुःख सुखावर
कुठूनी सजले.....
.
.
===========
स्वाती फडणीस
२५१२०९