क्षुधावर्धक पुदिना सरबत (मिंट ज्युलेप)

  • ताज्या पुदिन्याच्या पानांचा रस ८ टेबलस्पून
  • चवीप्रमाणे मीठ, साखर, लिंबाचा रस
  • बर्फाचा चुरा
  • प्यायचा सोडा - २ बाटल्या (किंवा इनो फ़्रूटसॉल्ट सुद्धा वापरू शकता)
१० मिनिटे
चार माणसांसाठी

पुदिन्याच्या रसात चवीप्रमाणे मीठ, साखर, लिंबाचा रस घालून नीट मिसळून घेणे.

चार उंच काचेच्या पेल्यांमध्ये तळाशी बर्फाचा चुरा घालणे.

त्यावर समप्रमाणात पुदिना रस घालणे.

त्यावर काळजीपूर्वक सोडा ओतणे.

फ्रूट सॉल्ट घालायचे झाल्यास पुदिना रस घालल्यावर थोडे थंडगार पाणी घालून त्यात फ्रूट सॉल्ट घालणे.

वर लिंबाच्या आडव्या चकत्या कापून त्या तरंगत ठेवणे किंवा चकतीला चीर देऊन तिला पेल्याच्या कडेला उभी खोचणे.  सजावटीसाठी पुदिन्याचे पान/ पाने वरून घालणे.

देताना स्ट्रॉ ने हलवून देणे.

ह्यासाठी वापरायचे काचेचे पेले आपण अगोदर फ्रीजर मध्ये 'चील्ड' करू शकतो. तसेच मीठ पसरट ताटलीत घेऊन पेल्याच्या वरील कडा त्यात घोळवून मग ते पेले फ्रीजरमध्ये थंडगार करू शकतो.

लिंबाच्या चकत्यांऐवजी संत्रे, मोसंबे ह्यांच्या आडव्या पातळ चकत्या देखील वापरता येतात.

भूक वाढविण्यासाठी, पचनासाठी हे सरबत अत्यंत उपयुक्त असून ऍप्रेटिफ म्हणून द्यायला छान आहे.