फेब्रुवारी
२
२०१०
तुझे लाजणे की मला हा उखाणा,
सखे आज पुरता मी झालो दिवाणा....
तुझे मुग्ध बसणे, असूनी न असणे,
मनाच्याच आरश्यांत, पाहून हसणे,
जणू हा मला मोहण्याचा बहाणा,
सखे आज पुरता मी झालो दिवाणा....
असे काय होते, मनाच्या तळाशी,
लपेटून घेता, तुला बाहुपाशी,
नुरे भान माझे न उरतो शहाणा,
सखे आज पुरता मी झालो दिवाणा....
तुझे काय जाते, तुझा खेळ होतो,
तुझ्या ह्या अदांनी, मी घायाळ होतो,
कसा प्राण जातो न कळतेच बाणा,
सखे आज पुरता मी झालो दिवाणा....
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
तुझे काय जाते, तुझा खेळ होतो..
प्रे. सतीश वाघमारे (बुध., ०३/०२/२०१० - १७:५६).
तुझे काय जाते, तुझा खेळ होतो
प्रे. बेफ़िकीर (गुरु., ०४/०२/२०१० - ०७:३५).