(वरदाची कविता)
वाद्यसंगम
वाद्ये निरनिराळी, पेटी तबला गिटार बासरी
वीणा तंबोरी सतार, संगतीला तारी धारदार
ढोलकी ढुमढुम बाज, असे हे वेगवेगळे आवाज॥१॥
साथसंगत करी एकमेकांना, दंग करी आवाज मधुर श्रोत्यांना
म्हणती यास वाद्यसंगम, यांची होते एक सुरेल सरगम
ईश्वराची कृपा झाली, ऐसी वाद्ये आपणांस मिळाली॥२॥
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
थक्क झाले
प्रे. मधुरा गोडसे (रवि., ०७/०२/२०१० - १७:१७).
सुरेख !
प्रे. जयश्री अंबासकर (सोम., ०८/०२/२०१० - ११:३३).
छान.
प्रे. गंगाधर मुटे (बुध., १०/०२/२०१० - १३:१७).