फेब्रुवारी
८
२०१०
कोणती धुंदी चढावी काळजावर..?
ना तसे काळीज उरले धुंदल्यावर...
लढ जसे तू पाहिजे, पण काळजी घे..
आपला फासा न यावा आपल्यावर
'सांगणे त्याने घराणे बंद केले.. '
स्वप्न ही पडतात हल्ली जागल्यावर
बोल तूही जे जसे बोलायचे ते
काय कामाची प्रसिद्धी? झाकल्यावर?
आपले संबंध इतके मोकळे की..,
मोकळे वाटून गेले तोडल्यावर
कोणती शिक्षा न झाली आजही अन
काढले खटले निकाली शेकड्यावर
'ठेवले नाते अजूनी.. जोडलेले.. '
कोणते उपकार झाले आमच्यावर..?
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
आपले संबंध इतके मोकळे की..,
प्रे. मिलिंद फणसे (सोम., ०८/०२/२०१० - १६:२१).
किंचित बदल
प्रे. महेश (सोम., ०८/०२/२०१० - १६:३५).
वा!
प्रे. कुमार जावडेकर (सोम., ०८/०२/२०१० - २१:०७).
अगदी हेच
प्रे. छाया राजे (मंगळ., ०९/०२/२०१० - १४:४२).
सहमत आहे
प्रे. चक्रपाणि (बुध., १०/०२/२०१० - ०४:२९).
आवडली.
प्रे. गंगाधर मुटे (बुध., १०/०२/२०१० - १३:०७).
काढले खटले निकाली ..
प्रे. सतीश वाघमारे (बुध., १०/०२/२०१० - १८:३१).