फेब्रुवारी
९
२०१०
फुलणे नव्याने नको आणखी
उमलून मिटणे नको आणखी
घायाळ व्हावे पुन्हा मीच का
इष्कात झुरणे नको आणखी
गंधात न्हालो तुझ्या साजणी
निशिगंध, चाफे नको आणखी
येणे तुझे क्षणभराचेच का
पेटून विझणे नको आणखी
नजरेत जरबी कट्यारी तुझ्या
बंदी, पहारे नको आणखी
धुंदी चढावी सुरांनी तुझ्या
कुठले बहकणे नको आणखी
जगतोच आहे तुझ्याही विना
आधार फसवे नको आणखी
जवळीक नाही अताशा कुठे
जखडून घेणे नको आणखी
जयश्री
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
आधार फसवे नको आणखी
प्रे. बेफ़िकीर (मंगळ., ०९/०२/२०१० - १३:३१).
आवडली
प्रे. मिलिंद फणसे (मंगळ., ०९/०२/२०१० - १५:२९).
छान
प्रे. मिलन टोपकर (बुध., १०/०२/२०१० - ११:११).
मस्त.
प्रे. गंगाधर मुटे (बुध., १०/०२/२०१० - १२:५९).
उमलून मिटणे..
प्रे. सतीश वाघमारे (बुध., १०/०२/२०१० - १८:३३).
सुंदर
प्रे. कुमार जावडेकर (बुध., १०/०२/२०१० - २०:४४).
धन्यवाद !!
प्रे. जयश्री अंबासकर (गुरु., ११/०२/२०१० - ०४:२४).
कवयित्री असल्यामुळे 'जगतेच'
प्रे. कुमार जावडेकर (गुरु., ११/०२/२०१० - १७:१९).
गझल.. अर्थवती आणि रुपवतीही
प्रे. बाबासाहेब जगताप (रवि., १४/०२/२०१० - १२:४५).
मस्त, छान
प्रे. कवि शरद गोरे (सोम., २२/०२/२०१० - १५:५३).
शुक्रिया !!
प्रे. जयश्री अंबासकर (मंगळ., २३/०२/२०१० - ०९:२३).