बटाट्याच्या किसाचे थालिपीठ---एक झटपट पदार्थ

  • बटाटे धुवुन किसावे
  • तेल / तुप
  • जीरा पावडर
  • लाल तिखट
  • मीठ
  • असले तर दाणाकुट
१० मिनिटे
माणशी दोन बटाटे

अण्ड्या नंतर झटपट होणारा शाकाहारी पदार्थ हा आहे जो रो मटेरिअल पासून झटपट खाद्य पदार्थ असा प्रवास कमीत कमी वेळात होतो.

बटाट्याचा कीस जेव्हा पातेल्याला चिकटून खरपूस लागतो -तिच चव या थालिपीटा ला येते . 
किसलेले बटाट्यात मीठ, तिखट, जिरा पावडर आणि असले तर कूट मिसळा आणि कालवा . छोटे गोळे करा आणि तव्यावर तेल / तूप घालून तवा गरम करा . गोळ्या चे थालीपीठ त्या वर पसरा, झाकण ठेवा आणि थोड्या वेळाने उलथून दुसऱ्या बाजूने खरपूस परता. 
किसाला जरी पाणी सुटले तरी ते  मिसळत राहा आणि थालीपीठा साठी वापरा, फुकट घालवू नका
गरम असताना तूप / लोणी बरोबर खा

अती भूक लागल्या वर ती काढण्यासाठी हा एक पदार्थ आहे . जसे अन्ड्याचे उकडून किंवा फ्राय करून , किंवा ग्लुको बिस्किटाचे दुधा बरोबर साखर घालून पिठले/ पोरिजऱ्हे जलद भूक भागवण्याचे पदार्थ आहेत 

स्वप्रयोग